शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:12 IST

कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देद्राक्ष उत्पादक धास्तावले : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी कसरत

मानोरी : कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत.तीन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ तर कधी हवेत गारवा आणि धुके निर्माण होत आहे. त्यात भर पडली ती अवकाळी पावसाच्या सरींची. यामुळे द्राक्षांसह इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू झाली आहे. आधीच विविध प्रकारच्या रोगांनी आक्रमण केल्यानंतर पिकांना आता अवकाळीने घेरल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यानंतर या पिकातून उत्पादन खर्च देखील फिटला नसतानाच त्यात पुन्हा अवकाळी पावसाच्या हजेरीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी दिवसातून एक ते दोन औषध फवारणी करत असून रात्रीच्या वेळीसुद्धा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकºयावर आली असून, दुसरीकडे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पिके जगवावीत कशी, हा यक्षप्रश्न शेतकºयांना पडलेला दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्याला यंदा आॅक्टोबर महिन्यात एका अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान केले असतानाकांदा लागवडीसाठी रोपांचीवानवा भासत आहे. यंदा कांद्याचे दर हे मागील काही दिवसांपासून तेजीत असल्याने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी तीन ते चार वेळेस कांद्याचे रोप तयार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या या आशेवर पाणी फेरले असून, यंदा कांदा लागवडीसाठी रोपांची उपलब्धता करणे सर्वसामान्य शेतकºयांना आवाक्याबाहेर झाले आहे.मिळेल त्या किमतीत कांदा रोपाची खरेदीकांद्याचे दर टिकून असल्याने कांद्याच्या रोपाला सोन्याचा दर मिळत आहे. मिळेल त्या किमतीत शेतकरीवर्ग कांद्याची रोपे घेऊन कांदा लागवड करीत आहेत. ज्या ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे, अशा ठिकाणीसुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याच्या बियाणाला एका पायलीसाठी सात ते आठ हजार रु पये मोजावे लागत असून, महागड्या दराने बी घेऊन कांदा लागवडीकडे शेतकरी वर्ग व्यस्त असताना अवकाळी पावसाची शेतकºयांनी धास्ती घेतली आहे.द्राक्षबागेला फळ लागले असून, ढगाळ वातावरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत आहे. त्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने द्राक्षबाग वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असून, शेतकरी वर्ग पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- दत्तात्रय शेळके, द्राक्ष उत्पादक, मानोरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती