शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

By admin | Updated: June 4, 2015 00:34 IST

पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांचे निलंबन केल्याच्या कारणावरून पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक इशाऱ्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारनंतर काम पूर्ववत सुरू केल्याचे चित्र आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह तब्बल नऊ तहसीलदारांना धान्य घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्यातील सात जणांची चूक नसल्याचे कारण देत तहसीलदार संघटनेसह कर्मचाऱ्यांनी पुरवठ्याचे काम बंद केले होते. त्यातच अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचीही बदली झाली. नागरिकांना वेळेवर रेशनचे धान्य मिळत नसल्याचे कारण देत काही संघटनांनी जिल्हा पुरवठा कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. धान्य उचलण्यासही कोणी वाहतूकदार इच्छुक नसल्याने पुरवठ्याचे काम थांबले होते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांना धान्य पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर होता. मात्र आता पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाजात सहभाग घेतल्याने पुरवठा खात्याचे काम हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)