शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व सरींनी शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

ढगांच्या गडगडाट अन‌् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजल्यापासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार ...

ढगांच्या गडगडाट अन‌् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजल्यापासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शरणपूर रोड, कॉलेज रोड, सिडको, सातपूरसह पंचवटी, नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड भागाला पावसाने झोडपले. रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरू झाला. ढगांचा गडगडाट अन‌् विजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. उंच-सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. स्मार्टसिटीअंतर्गत शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी त्रेधातिरीपिट उडाल्याचे दिसून आली. कामगारांना हातातील काम सोडून आडोशाला जावे लागले.

---इन्फो--

तापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्के

रात्री उशिरापर्यंत काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातसुद्धा हलक्या सरींचा वर्षाव सुरुच होता. तसेच ढगाळ हवामानही कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला असला तरी कमाल तापमानाचा पारा शहरात रविवारी ३४.४ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली. यासोबतच संध्याकाळी वातावरणात आर्द्रतेचेही प्रमाण वाढलेले दिसून आली. ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.

---इन्फो--

पुढील चार दिवस सरींची शक्यता

भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरला. मान्सूनपूर्व सरींनी शहरासह ग्रामीण भागाला शनिवार व रविवारी झोडपून काढले. येत्या १० जूनपर्यंत कोकणात मान्सून प्रवेश करणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.