शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:28 IST

यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच नमाज, फातिहापठण करून साधेपणाने ईद साजरी केली.

ठळक मुद्देकोरोनामुळे दक्षता : शहरात साधेपणाने रमजान ईद सण साजरा

नाशिक : यावर्षी रमजान पर्वासह ईदवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सोमवारी (दि.२५) रमजान ईद सण शहरात अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे गजबजणारे ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदान यंदा ओस पडलेले दिसून आले. सामूहिक नमाजपठणाचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच नमाज, फातिहापठण करून साधेपणाने ईद साजरी केली.‘ईद उल फित्र’ अर्थात रमजान ईद आज सर्वत्र साजरी झाली, मात्र कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाज बांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. सामूहिक नमाजपठण टाळत नागरिकांनी घरांमध्येच नमाज अदा केली.ईदगाहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. शहरासह सर्वच उपनगरांमध्येही लॉकडाउन नियमांचे व जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे पूर्णपणे पालन करण्यात आले. कुठल्याही मशिदीच्या आवारात समाजबांधव जमले नाही. सकाळी सात वाजता सर्वच उपनगरीय मशिदींमधून धर्मगुरूंनी ध्वनिक्षेपकांद्वारे ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तसेच घरांमध्ये कोणत्या नमाजचे व कसे पठण करावे, याबाबत माहिती समजावून देत सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यामुळे सकाळी मुस्लीम बहुल भागातसुद्धा लगबग दिसून आली नाही. युवकांनीही धर्मगुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मुस्लीम बहुल भागात सर्वत्र शांततेत आणि साधेपणाने ईद सण साजरा करण्यात आला.एकमेकांना शुभेच्छा देताना फिजिकल डिस्टनच्या नियमांचे पालन करण्यात आले. बाजारपेठेतही नेहमीपेक्षा खरेदीला फारशी गर्दी दिसून आली नाही. एकमेकांच्या घरी जाऊन अनेकांनी शिरखुर्म्याचा आस्वादही घेतला.मशिदीही ‘लॉकडाउन’ईदगाह मैदानासह सर्वच मुस्लीमबहुल भागासह उपनगरांमधील लहान-मोठ्या मशिदी मागील दोन महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ आहेत. ईदच्या दिवशीही मशिदींमध्ये कोणीही सामूहिक नमाजपठणाकरीता गर्दी केली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी समाजबांधवांनी आपापल्या घरांमध्ये ईद साजरी केली.दरवळला शिरखुर्म्याचा सुगंधरमजान ईद म्हटली की शिरखुर्मा हे खास खाद्यपदार्थ सर्वांच्याच पसंतीचे. ईदच्या औचित्यावर मुस्लीम बहुल भागात दुधात सुकामेवा टाकून तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्याचा सुगंध दरवळला होता. समाज बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन ईदनिमित्त शिरखुर्म्याचा आस्वाद अपवादानेच घेतला.‘डिस्टन्स’ राखून दिल्या शुभेच्छाईदच्या शुभेच्छा म्हणजे गळाभेट आणि हस्तांदोलन असे समीकरण ठरलेले, मात्र यावर्षी कोरोनाचे संक्रमण टाळण्याकरिता शक्यतो समाज बांधवांनी परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ राखूनच एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमRamzan Eidरमजान ईद