शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

देशभरातील भाविकांची प्रार्थना

By admin | Updated: February 12, 2017 00:23 IST

बाळ येशू यात्रोत्सव : मंदिरात दीड दिवसाच्या जन्मोत्सवाला प्रारंभ

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रा उत्सवाला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. दिवसभर झालेल्या सामूहिक मिस्सा प्रार्थनेमध्ये देशाच्या व राज्याच्या विविध भागातून पन्नास हजाराहून अधिक ख्रिस्तीबांधव सहभागी झाले होते. नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजेपासून प्रत्येक तासाला सेंट झेवियर शाळेच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य सभा मंडपात विविध ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली मराठी, इंग्रजी व तामीळ भाषेतून सामूहिक प्रार्थना म्हणण्यात आली. तसेच बाळ येशू मंदिरात दर्शनासाठी तसेच नवसपूर्तीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर झालेल्या सामूहिक मिस्साबली प्रार्थना सभांमध्ये फादर ट्रेव्हर मिरांडा, फादर लिनस डिमेलो, सेड्रीक रिबेलो, जोईल नोरान्हा, विन्सी डिमेलो, रॉबर्ट पेन, विन्संट वाझ, टोनी डिसूझा, लिरॉय रॉड्रीक्स, ख्रिस्तोफर जयकुमार, फ्रान्सिस फर्नांडिस, स्टिफन घोसाल, ब्रिमॉन डिसूझा, बॅप्टीस पिन्टो, डियॉन लोबो आदिंसह विविध धर्मगुरूंनी भाविकांना मार्गदर्शन केले.बाळ येशूच्या यात्रेनिमित्त देश व राज्याच्या विविध भागातून ५० हजाराहून अधिक ख्रिस्तीबांधव उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त बाळ येशू मंदिराच्या दुतर्फा पूजासाहित्य, रंगीबेरंगी मेणबत्त्या, मेणाचे पुतळे, फळ, मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थांची आदि विविध दुकाने थाटण्यात आली होती. नेहरूनगर, जयभवानी रोड, उपनगर ते घंटी म्हसोबा मंदिर या परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्याने या परिसरास वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच महामार्गावर भाविकांबरोबरच इतर वाहनांच्या गर्दीमुळे सायंकाळी उशिरापर्यंत संथगतीने वाहतूक सुरू होती. पोलिसांना वाहतुकीची कोंडी सोडवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत होती. रविवारी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत सामूहिक मिस्साबली प्रार्थना होऊन यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. चोरांचा उपद्रवयात्रोत्सवाला झालेल्या गर्दीमुळे भुरट्या चोरांनी अनेक भाविकांना आपला हात दाखवला. अनेकांचे मोबाइल, पैशाचे पाकिट, पर्समधील पैसे, मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. (वार्ताहर)