शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी-सीएएविरोधात प्रार्थनासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:13 IST

इमाम अहमद रजा इदगाह मैदान येथे पास्बाने ऐन-ए-हिंद कमिटीच्या वतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देमालेगाव : पास्बाने ऐन-ए- हिंद कमिटीतर्फे कार्यक्रम

मालेगाव मध्य : इमाम अहमद रजा इदगाह मैदान येथे पास्बाने ऐन-ए-हिंद कमिटीच्या वतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आली.यावेळी मुफ्ती नुुरुलहसन मिस्बाही यांनी मार्गदर्शन केले. भारतीय नागरिकांना आपण भारतीय आहोत हे सिद्ध करावे लागणे हा भारतीयांचा अपमान आहे. देश शांततेत विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहे. सरकारने लादलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात सर्वत्र निदर्शने होत आहे. मात्र काही लोकांकडून पवित्र ज्ञानदान करणाऱ्या केंद्रावर हल्ले होत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून दोन्ही कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रार्थना सभेत करण्यात आला. हाफीज सज्जाद हुसेन अशरफी यांचेही भाषण झाले. यावेळी शाहीनबाग येथील आंदोलनात सहभागी झालेले अब्दुल कादीर, मोहंमद अल्मास यांच्यासह मोहंमदनईम मिस्बाही, मौलाना अहमद रजा अजहरी, मोहंमद अशफाक अमजादी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही कायद्याच्या विरोधात व देशाच्या शांततेसाठी सामूहिक दुवा पठण करण्यात आले. यावेळी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी राष्टÑध्वज घेत किदवाई रस्ता येथील शहीदों की यादगार येथून दुचाकीने निघत नवीन बसस्थानक, खोका नाका, देवीचा मळामार्गे इमाम अहमद रजा इदगावर पोहचले. यावेळी हाफीज अमीन अशरफी, हाजी रफीक अतारी, हाफीज उमर फारुख, हाफीज मोहंमद रफीक, अ‍ॅड. जमाल शेख, मुदस्सर रिजवी, डॉ. रईस रिजवी, कारी जैनुलअबादीन यांच्यासह मौलाना मुफ्ती, मुस्लीम बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीम