दातली येथील मंदिर जीर्ण झाल्याने लोकवर्गणीतून नव्या मंदिराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त विठ्ठल-रूख्मिणी, ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे व कलशाचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरात होम-हवन, अभिषेक, महापूजा, यज्ञ आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. टाळ-मृदृंगाच्या गजरात सजवलेल्या रथामधून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रविवार (दि.३१) रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल-रूख्मिणी, ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामायाणाचे गाढे अभ्यासक ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर ९.३० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ढोक यांचे किर्तन पार पडले. कै. नकूबाई आव्हाड यांच्या स्मरणार्थ सुकदेव सावळीराम आव्हाड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दातली, केदारपूर, शहापूर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकवर्गणीतून साकारलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 17:25 IST