ब्राह्मणगाव : येथील ब्राह्मणगाव-अजमीर सौंदाणे रोडलगत असलेल्या साईबाबा द्वारकामाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा खमताणे येथील विश्वश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि साईबाबा समाधी मंदिराचे भूमिपूजन विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाले.ब्राह्मणगाव साई सेवक मंडळातर्फे आयोजित श्री साई सचरित्र सात दिवसीय श्री साईबाबा संगीतमय कथा साई कथाकार विकास महाराज गायकवाड यांनी सादर केली. तर ज्ञानेश्वर महाराज गायकवाड यांनी पारायण केले.या सोहळ्यात साडेसातशे पारायाणार्थींनी सहभाग घेतला होता. श्री साईबाबा यांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. दीपक अहिरे, स्मिता आहिरे, शशिकांत बच्छाव, तुषार आहिरे, विनायक शिरोडे आदी ट्रस्टच्या सदस्यांनी संयोजन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, राघोनाना अहिरे, सरपंच सरला अहिरे, ज्ञानदेव अहिरे, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, किरण अहिरे, विनोद अहिरे, माजी उपसरपंच गोटू पगार, आदी उपस्थित होते.
साईबाबा समाधी मंदिरात प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:22 IST
ब्राह्मणगाव-अजमीर सौंदाणे रोडलगत असलेल्या साईबाबा द्वारकामाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा खमताणे येथील विश्वश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि साईबाबा समाधी मंदिराचे भूमिपूजन विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाले.
साईबाबा समाधी मंदिरात प्राणप्रतिष्ठा
ठळक मुद्देअजमीर सौंदाणे : परिसरात भक्तिमय सोहळा