शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

प्रमोद महाजन उद्यानात रंगली दीपावली पूर्वसंध्या

By admin | Updated: October 31, 2016 01:53 IST

विनोदाचे फवारे : सदाबहार मैफलीला प्रतिसाद

 नाशिक : विनोदी फवारे आणि स्वरांचा फराळ असा दुग्धशर्करा योग साधत शिवसेना, ऊर्जा युवा प्रतिष्ठान, शिवकेसरी कला-क्रीडा मंडळ व राणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यानात दीपावली पूर्वसंध्या मैफल रंगली. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके यांनी उपस्थिताना मनसोक्त हसविले, तर ‘सारेगमप’ फेम राहुल सक्सेना, सावनी रवींद्र यांनी आपल्या सुरेल आवाजाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. पाहुण्यांचे स्वागत शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, संगीता देसाई, गोकुळ पिंगळे यांनी केले. ‘बाप्पा मोरया’ गीतापासून मैफलीला प्रारंभ झाला. सावनी रवींद्र हिने आपल्या सुरेल आवाजात ‘नाही कळले कधी’, ‘अत्ताच बया का’, ‘गोऱ्या गोऱ्या’ या गाण्यांद्वारे रसिकांना रिझविले, तर राहुल सक्सेनाने ‘तेरी दिवानी’ या गीतापासून सुरु वात करीत ‘मितवा’, ‘दमादम मस्त कलंदर’ सह पंजाबी मेलेडी सादर करून रसिकांना तृप्त केले. राहुल आणि सावनीने ‘जीव रंगला’, ‘चिंब भिजलेले’, ही गाणी सादर करीत मैफल रंगवत नेली. अमोल पाळेकर यांनीही ‘लख्ख पडला प्रकाश’, ‘अश्विनी ये ना’, ‘जय मल्हार’, ‘खंडेरायाच्या लग्नाला’, ‘भगवं वादळ आलं ’ ही गिते सादर करून आपली वेगळी छाप कार्यक्र मावर सोडली. कार्यक्र माच्या अखेरीस ‘झिंगाट’ गीतावर रसिकांनी मनसोक्त ताल धरला. संगीतसाथ अनील धुमाळ व जय भालेराव (की-बोर्ड), अभिजीत शर्मा (आॅक्टोपॅड), नीलेश सोनावणे (गिटार), मनोज गुरव ( बासरी), स्वरांजय धुमाळ व देवानंद पाटील (ढोलकी) यांनी दिली. श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन दिले. कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्या, शिट्या व नृत्याच्या ठेक्याद्वारे रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.