शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सलग आठ वर्षे घरी न जाता केला आखाड्यात सराव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

नाशिक : रुस्तम-ए-हिंद बिराजदार मामा यांच्याकडे बालपणापासून सराव करताना मामांनी सांगितलेले वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे. पहिलवानाने जर ...

नाशिक : रुस्तम-ए-हिंद बिराजदार मामा यांच्याकडे बालपणापासून सराव करताना मामांनी सांगितलेले वाक्य माझ्या मनावर कोरले गेले आहे. पहिलवानाने जर एक दिवस आखाडा चुकवला तर तो आठ दिवस मागे येतो, हे मामांचे वाक्य आजदेखील स्मरणात आहे. त्यामुळेच सलग आठ वर्षे घरापासून, सण-समारंभांपासून दूर राहून घरी न जाता मेहनत केल्याचे फळ भविष्यात मिळाले. तसेच आजदेखील केवळ कुस्तीचाच विचार करतो, असेही आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे यांनी प्रकट मुलाखतीत सांगितले.

महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कारार्थी राहुल आवारे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीवेळी बोलताना आवारे यांनी पुण्यामध्ये वयाच्या आठव्या वर्षी वडिलांनी गोकुळ वस्ताद तालमीमध्ये रुस्तम-ए-हिंद बिराजदार मामा यांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे मेहनत करून घेतल्याचे सांगितले. तसेच शालेय जीवनामध्ये मिळवलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या सुवर्णपदकाचे महत्त्व सांगताना शाळेतील क्रीडा शिक्षकांनी कशाप्रकारे शालेय जीवनात प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी नमूद केले. पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाने मल्ल म्हणून कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्याचबरोबर आई-वडिलांनीदेखील कुस्ती क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी क्रीडा वाटचालीविषयी माहिती दिली. यानंतर तालुका क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू संदीप वांजळे यांनी मुलाखतीस सुरुवात केली. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आलेले होते. सूत्रसंचालन करून आभार क्रीडा संचालक डॉ. संतोष पवार यांनी मानले.

इन्फो

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदकाचा विश्वास

हरियाणा, पंजाब ही उत्तरेकडील राज्यात ज्या प्रकारे कुस्ती व अन्य खेळांच्या खेळाडूंना कशा प्रकारे शालेय स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा मार्गदर्शन व सुविधा, आर्थिक पाठबळ, नोकरी इत्यादी सर्व गोष्टींमध्ये पूर्ण क्षमतेने मदत करतात, तसेच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, या गोष्टी महाराष्ट्रत कमी प्रमाणात पाहावयास मिळतात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच माझी सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी असून २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नक्कीच भारताचा तिरंगा फडकवू, असा विश्वासदेखील आवारे यांनी व्यक्त केला.

फोटो

०५राहुल आवारे