शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ब्रिटिशकालीन कबरींचा पुरातत्व विभाग करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:08 IST

नाशिकला वारसास्थळांचा जिल्हा म्हटलं तर वावगं होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिवंत इतिहास येथील ख्रिस्ती दफनभूमीतील कबरींभोवती दडलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने सकारात्मकता दर्शविली असून, त्यादृष्टीने लवकरच पाहणी दौरा केला जाणार आहे.

लोकमत  विशेषनाशिक : नाशिकला वारसास्थळांचा जिल्हा म्हटलं तर वावगं होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिवंत इतिहास येथील ख्रिस्ती दफनभूमीतील कबरींभोवती दडलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने सकारात्मकता दर्शविली असून, त्यादृष्टीने लवकरच पाहणी दौरा केला जाणार आहे.नाशिक शहरातील एकमेव ख्रिस्ती दफनभूमी सारडा सर्कल या भागात आहे. या दफनभूमीमध्ये प्रवेश करताच पांढऱ्या संगमरवरी दगडात आकर्षक पद्धतीने बांधलेली लेप्रसी निर्मूलन मिशनच्या रोसाली हार्वे यांची १९३२ सालची कबर नजरेस पडते. जणू ही कबर ख्रिस्ती धर्मीयांच्या आरोग्यसेवेची साक्षच देते. उजव्या बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यास काळ्याभोर दगडामध्ये भक्कम बांधकाम असलेल्या पुरातनकबरी गाजरगवताआडून दृष्टीस पडतात. ‘ब्रिटिश कोटा’ असे या भागाचे नाव आहे.‘जॅक्सन’ची कबरही याच दफनभूमीतस्वातंत्र्य चळवळीचे नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात नाशिकसोबत विविध घटनांचा संदर्भ जोडलेला आहे. त्यामध्ये येथील विजयानंद चित्रपटगृहात २१ डिसेंबर १९०९ साली हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आॅर्थर मेसन तिप्पेटस जॅक्सन याची गोळ्या झाडून हत्या केली होती. जॅक्सन याची कबरही या दफनभूमीत पहावयास मिळते.या भागात स्वातंत्र्यानंतर ख्रिस्ती समाजबांधवांसाठी दफनविधीला मुभा देण्यात आलेली नाही. हा भाग आजही राखीवच आहे. या भागातील इंग्रज अधिकाºयांच्या कबरींचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम स्थापत्य. वेगवेगळ्या आकारांमध्ये काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या कबरी लक्ष वेधून घेतात.प्रत्येक कबरीवर त्या अधिकाºयाची इत्यंभूत माहिती इंग्रजीमध्ये कोरलेली दिसते. बहुतांश कबरींची काळानुरूप पडझड झाली आहे. हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा, जेणेकरून भारतीय स्वातंत्र्यपूर्व इतिहासामध्ये अधिक माहितीची भर पडण्यास मदत होईल. राज्य पुरतत्व विभागाने यासंदर्भात माहिती घेऊन या कब्रस्तानला भेट देऊन येथील पुरातन कबरींची पाहणी केली जाणार असल्याची माहित्री सूत्रांनी दिली.शहरातील वारसा स्थळांच्या यादीत या दफनभूमीतील पुरातन कबरींचाही समावेश होण्याची शक्यता आहे. कारण पुरातन कबरी, त्यांचे बांधकाम आणि इतिहास हा दुर्मीळ असून त्याचा अभ्यास पुरातत्व खात्याकडून केला जाणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण