शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

नाशिक : नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप ...

नाशिक : नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थितीने अनोखी झळाळी लाभणार आहे.

भविष्यातही मराठी टिकावी आणि उद्याच्या नागरिकांमध्येदेखील मराठीच्या साहित्याची ओढ जोपासली जावी, या उद्देशाने नाशिकच्या साहित्य संमेलनापासून प्रथमच संमेलनात बालमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकट्टा व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात बाल कविसंमेलन, कथाकथन, बाललेखकांशी संवाद, असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. प्रख्यात अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीचा आनंददेखील बालकांसह रसिकांना मिळू शकणार आहे. संमेलनाला येणाऱ्या रसिकांमध्ये बालकांचादेखील अंतर्भाव व्हावा, त्यातून साहित्य संमेलनाचे हे महाद्वार त्यांच्यासाठीदेखील खुले व्हावे, तसेच बालकांमध्येदेखील बालसाहित्यासह अन्य साहित्याची रुची निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याशिवाय या बालवाचकांमधूनच उद्याचे बाललेखक घडावेत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे बालकवी कट्ट्यासाठी व कथाकथनासाठी बालसाहित्यिकांनी balkattansk94@gmail.com या मेल आयडीवर त्यांची स्वरचित कविता व स्वरचित कथा दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत नाव, मोबाइल नंबर व पत्त्यासह पाठवावी. या संमेलनात ज्या ज्या बालकवींची व कथाकारांची निवड होईल त्यांना संमेलनात कविता व कथा सादर करण्याची संधी मिळू शकणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बालकांनी या बालमेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, भगवान हिरे यांनी केले आहे. या बालमेळाव्याच्या आयोजनामागे सावानाच्या बाल विभागाचे प्रमुख तसेच संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांची संकल्पना आणि परिश्रम फलद्रूप झाले आहेत.

इन्फो---

‘बोक्या सातबंडे’ची यशोगाथा

प्रचंड प्रतिभावान, अष्टपैलू आणि प्रयोगशील अभिनेता ही प्रभावळकरांची मुख्य ओळख असली तरी प्रसन्न हास्याचा शिडकावा करणारा प्रतिभावान लेखक हीदेखील त्यांची दुसरी ओळख आहे, तसेच खुदकन हसवता-हसवता अंतर्मुख करणारे लिखाण करतानाच ‘बोक्या सातबंडे’सारखा गमतीशीर, खट्याळ बालनायक रंगवतानच बालकांच्या मनात संस्कारांची पेरणी करणारे लेखक म्हणूनदेखील प्रभावळकर सर्वज्ञात आहेत. या बोक्या सातबंडेच्या बालकथांना प्रचंड प्रतिसाद लाभल्याने त्याचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. वा पुस्तक मालिकेला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारदेखील लाभला आहे.

फोटो

०७दिलीप प्रभावळकर