शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

भाजपाने बनविली नाशिकची प्रभागरचना

By admin | Updated: September 15, 2016 01:03 IST

शिवसेनेचा आक्षेप : सोयीने केलेल्या मोडतोडीविषयी तक्रार

र्नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभागरचना कितीही गोपनीय असल्याचा दावा केला जात असला तरी ती फुटली असून भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या सोयीने प्रभाग बनवून घेतल्याचा आक्षेप शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करून शासनामार्फत नवीन प्रभागरचना तयार करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.शिवसेनेचे माजी नगरसेवक भगवान भोगे, रिमा भोगे, हरिभाऊ लासूरे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी ही तक्रार नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी प्रभागाचे प्रारूप तयार करून महापालिकेने निवडणूक आयुक्तांना सादर केले आणि त्यांनी छाननी करून ते राज्य निवडणूक आयोगाला सादर केले आहे. मात्र, भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या सोयीने प्रभागरचना केल्याचे ते स्वत:च फुशारकीने सांगत आहेत, त्यांनी ज्या प्रकारची रचना केली आहे ती खरी आहे किंवा नाही याबाबत कानोसा घेतला असता, त्यात आमच्या स्तरावर तथ्य आढळले आहे. परंतु आता विभागीय आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाकडे असलेल्या प्रतींची छाननी करावी आणि फेररचना करावी, अशी मागणी या माजी नगरसेवकांबरोबरच मुकुंद कांबरी, सचिन टिळे, सचिन परदेशी, दिलीप मोरे यांच्या सह्या आहेत.शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपले नातेवाईक असलेले नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांची बदली होऊ दिली नाही. उलट त्यांना या विभागाचे प्रमुख करून त्यांच्या मदतीनेच सोयीची प्रभाग रचना करून घेतली. यात पंचवटीत वाघाडी नदीपासून पश्चिमेकडील वाल्मीकनगर, संजयनगर, मजूरवाडी, राजवाडा, अवधूतवाडी अशा सर्व झोपडपट्ट्या एकत्र करून एकच प्रभाग केला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाच प्रभागांची मोडतोड करून हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रभागरचनेत गुजराथी मतदारच कसे मोठ्या संख्येने राहतील अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. ही प्रभागरचना करताना नदी ओलांडणे किंवा महामार्ग ओलांडणे, जनगणनेचे ब्लॉक तोडणे, लोकसंख्येचे संतुलन असे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रभागरचना केल्याचा आरोप करण्यात आला असून राजकीय दबावाखाली तयार केलेली प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)