शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई सूट हीच ‘वर्दी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST

उत्तर भारतीयांना ‘खाकी’ मदतीचा हात गेल्यावर्षी लॉकडाऊन झाले आणि दुसऱ्यांदा लॉकडाऊनची मुदत अजून पुढे वाढविली गेली. यामुळे उत्तर भारतीय ...

उत्तर भारतीयांना ‘खाकी’ मदतीचा हात

गेल्यावर्षी लॉकडाऊन झाले आणि दुसऱ्यांदा लॉकडाऊनची मुदत अजून पुढे वाढविली गेली. यामुळे उत्तर भारतीय मजुरांकडे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसेही शिल्लक राहिले नाही. अशावेळी खाकी त्यांच्या मदतीला धावून गेली. मध्यवर्ती गुन्हे शाखेने एका खासगी बँकेच्या सहकार्याने पोटाची भूक भागविण्यासाठी आवश्यक असलेला किराणा मालाचा पुरवठा पंचवटीतील कृष्णनगर भागात जाऊन परप्रांतीय मजुरांच्या वस्तीवर केला होता. पोलिसांची ही सामाजिक बांधिलकी त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती.

---

कोरोना पोलीस मदत कक्ष ठरला मैलाचा दगड

शहरात लागू करण्यात आलेली कडक संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक व अन्य सेवा पुरविण्यासाठी जनसामान्यांकरिता पोलीस आयुक्तालयात ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’देखील कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविणे तसेच ज्या नागरिकांना प्रवासाची अत्यंत गरज असून, त्यासाठी वैद्यकीय कारण आहे, अशा गरजूंना तत्काळ कोरोना कक्षातून मदत उपलब्ध करून देण्यात येत होती. यासाठी व्हॉट‌्स‌ॲप क्रमांक पोलिसांनी स्वतंत्ररीत्या जाहीर केले होते. हे कक्ष २४ मार्चपासून सप्टेंबरअखेरपर्यंत २४ तास कार्यान्वित होते. या कक्षाद्वारे नागरिकांना ५० हजार ४०४ इतक्या परवानग्या उपलब्ध करून दिल्या गेल्या.