नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून स्थलांतरित होण्याची चर्चा असलेला ६६० मेगावॉटचा वीज प्रकल्प नाशिकलाच राहणार असल्याचे चित्र असून, या सदंर्भात संरक्षण खात्याने वीज प्रकल्पाला आधी ‘नो फ्लार्इंग झोन’चा दाखला व नंतर प्रकल्प कायम राहण्यासाठी ना हरकत दाखला देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी यासंदर्भात मे २०१६ अखेर ना हरकत दाखला देण्याचे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांना दिल्लीत दिले.यासंदर्भात ८ सप्टेंबर २०१५ व १७ फेब्रुवारी २०१६ या दोन्ही दिवशी खासदार हेमंत गोडसे यांनी संरक्षण मंत्र्यांची भेय घेतली होती. तसेच नुकतीच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत भेट घेऊन एकलहरा येथील ६६० मेगावॉटच्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. हा प्रकल्प लष्कराच्या ना हरकत दाखल्यामुळे अडचणीत आल्याचे खासदार गोडसे यांनी संरक्षणमंत्र्यांना सांगितले. नवीन ६६० मेगावॉट प्रकल्प सुरू झाल्यानंतरच जुन्या प्रकल्पातील संच बंद करावे, शिवाय हा प्रकल्प बंद झाल्यास अथवा स्थलांतरित झाल्यास मोठी हानी होऊन अनेकांची रोजी रोटी बंद होणार आहे.
वीज प्रकल्प नाशकातच राहणार
By admin | Updated: April 12, 2016 00:20 IST