मालेगाव : कॅम्प भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास जनित्र उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मात्र शहरातील पूर्वभागात वीजपुरवठा खंडित झाल्यास जनित्राच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. मनपा प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत पूर्व-पश्चिम असा भेदभाव न करता कॅम्प भागास सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन एक्स्प्रेस फीडर वाहिनी टाकून त्याला समांतर अशी अतिरिक्त वीजवाहिनी टाकून जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा अखंडितपणे सुरळीत करावा, अशी मागणी कॅम्पवासीयांकडून करण्यात येत आहे.
वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: October 3, 2014 23:10 IST