ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विद्यमान सभापती गिरीश भामरे यांंच्या प्रगती पॅनलने सर्व जागांवर विजय संपादित करून सोसायटीवरील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. आदर्श पॅनलला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीकडे सर्व परिसराचे लक्ष लागून होते.यात सर्वसाधारण गटात प्रभाकर नारायण नहिरे (२७३), अनिल बाबूराव भामरे (२७७), अभिमन दादाजी भामरे (२७४), दिलीप वामन भामरे (२६५), मिथुन पोपटराव भामरे (२६१), साहेबराव लोेटन भामरे (२८९), सुभाष गजमल भामरे (३०४), सुरेश देवराम भामरे (२९५) विजयी झाले. विजय सीताराम नहिरे, बाळासाहेब झिप्रू पवार, वसंत त्र्यंबक बोरसे, त्र्यंबक निंंबा भामरे, दिनेश भिलाजी भामरे, नामदेव उखा भामरे, प्रमोद गोविंद भामरे, रवींद्र दामोदर भामरे पराभूत झाले.इतर मागास प्रवर्गात प्रगती पॅनलचे सूत्रधार गिरीश भामरे यांंनी सर्वाधिक (३२३) मते मिळवली. त्यांनी प्रदीप नथू भामरे यांचा पराभव केला. ही लढत तुल्यबळ झाली. महिला प्रवर्गातून अंजनाबाई कौतिक भामरे (२८६), केशरबाई भिकन भामरे (३०९) या विजयी झाल्या. त्यांंनी मनोरमा सुभाष चोपडा, जिजाबाई निंबा भामरे यांचा पराभव केला. भटक्या विमुक्त जाती गटात वसंत कौतिक मगर (२९८) विजयी झाले. त्यांनी दौलत तुकाराम गोसावी यांचा पराभव केला. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती गटातून रतन केशव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पॅनलचे नेते नारायण भामरे, गणपत भामरे, सदाशिव पवार, मधुकर नवरे, खंडेराव कोठावदे, वसंत भगर, श्यामराव भामरे, लक्ष्मण भामरे, सयाजी भामरे, केदा भामरे, उद्धव भामरे, अशोक भामरे, निंबा भामरे, तुकाराम भामरे, सरपंच भास्कर भामरे, नंदू खैरनार, पंडित शेवाळे, विष्णू सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)
सोमपूर सोसायटीवर प्रगतीची सत्ता
By admin | Updated: November 11, 2015 22:26 IST