निवडणुकीत आपलं पॅनलचे प्रभागनिहाय विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे, प्रभाग क्रमांक १ - बबन दामू पवार (१३६), चिंधाबाई पिंपळसे (१४५), पुष्पा शेरेकर (१३२), प्रभाग २ - गौतम गायकवाड (११०), सोनाली जाधव (बिनविरोध) तर विरोधी ग्रामविकास पॅनलचे विजय इप्पर (१४०) व शेवंताबाई दळवी (१६७) हे दोघे विजयी झाले. महेश शेरेकर हे माजी सरपंच असून, त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीत विजयाची हॅट्ट्रिक केली होती. यावेळी त्यांच्या पत्नी पुष्पा शेरेकर या विजयी झाल्या. विजयी उमेदवारांचा आमदार सुहास कांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शेरेकर, महेश शेरेकर, देविदास बोराळे, ज्ञानेश्वर साबळे, आबा पवार, सुकदेव हरी ताडगे, प्रताप ताडगे, बाळू राहुल ताडगे, कैलास पवार, सुकदेव दळवी, उत्तम बोराळे, भय्या सूर्यवंशी, संदीप शेरेकर, रघुनाथ काकड, दिलीप ताडगे, जाधव, काकासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.
उंबरदे ग्रामपंचायतीवर आपलं पॅनलची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST