देवळाली कॅम्प/चाडेगाव : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विविध ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे.शिंदेवर शिवसेनेची सत्तानाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वांत मोठी असलेल्या शिंदे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या धुरंधर पॅनलने ११ जागांवर विजय मिळवून सत्ता हस्तगत केली आहे, तर कॉँग्रेसच्या ग्रामविकास पॅनलला ५ व नवजीवन पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. वॉर्ड क्र. १- ज्ञानेश्वर मते (४३६), नितीन जाधव (३८०), विठाबाई झाडे (४०८), वॉर्ड २ - ज्ञानेश्वर जाधव (२४९), माधुरी तुंगार (४१३), फुल्याबाई तुंगार (३६७), वॉर्ड ३- बाजीराव जाधव (३३०), वंदना जाधव (३६४), रमाकांत साळवे (२८७), वॉर्ड ४- तानाजी जाधव (३३०), शोभा साळवे (२७७), सुलोचना जाधव (२९१), वॉर्ड ५- कुसुम तुंगार (२८८), गोरख जाधव (४०७), सुवर्णा पवार (३५७), वॉर्ड ६- अशोक बोराडे (२७१), मुक्ता तुंगार (२६५) हे विजयी झाले. पळसेत पुन्हा भगवापळसे ग्रामपंचायतीत शिवसेनेने १२ जागा मिळवून पुन्हा भगवा फडकवला आहे, तर राष्ट्रवादीला ४ व पहिल्यांदाच एका अपक्ष महिला उमेदवाराने विजय मिळविला आहे. वॉर्ड १ नवनाथ गायधनी (६७९), शैला आगळे (५३६), साहेबराव गायधनी (५७९), वॉर्ड २- अजित गायधनी (४३३), अपक्ष- माधुरी गायधनी (४४४), वॉर्ड ३- दीपक गायधनी (३४६), सोनाली चारसकर (४२५), सोनाली शिंदे (४६९), वॉर्ड ४- साधना चौधरी (८१६), भारती चंद्रमोरे (५८८), शंकर जाधव (५४३), वॉर्ड ५- सीमा गायकवाड (६६०), सुनीता गायखे (६३९), रवींद्र सरोदे (४५८), वॉर्ड ६ -देवीदास गायधनी (३५२), लीलाबाई गायधनी (३८६), दिलीप गायधनी (४००) हे विजयी झाले.
धुरंधर पॅनलने सत्ता हस्तगत
By admin | Updated: April 24, 2015 01:54 IST