शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पवारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:10 IST

केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीवाटपाचा अंतिम करार करण्याचा आग्रह केंद्राने धरला आहे़

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीवाटपाचा अंतिम करार करण्याचा आग्रह केंद्राने धरला आहे़ याबाबत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आहे़ हा पाणीवाटपाबाबतचा अंतिम करार झाल्यास महाराष्ट्राला आपल्या हक्कावर ‘पाणी’ सोडावे लागेल, अशी भूमिका जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर रविवारी (दि़१) प्रात्यक्षिकासह मांडून याकडे लक्ष घालण्याचे साकडे घातले़सोमवारी (दि़२) शहरात होणाºया शेतकरी अभियानाच्या समारोपसाठी पवार हे नाशिकमध्ये आले आहेत़ जाधव यांनी पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्र व गुजरात पाणी प्रश्नाबाबत आराखड्यासह सविस्तर सादरीकरण केले़ दमणगंगा-पिंजाळ लिंक या प्रकल्पातील एकूण ८३ टीएमसी पाण्यापैकी २० टीएमसी पाणी मुंबईला तर उरलेले ६३ टीएमसी पाणी गुजरातला जाणार आहे़तर नार-पार लिंकमधील ८४ टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाण्यावर महाराष्ट्राने आपला अधिकार असल्याचे सांगितले आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापी खोºयातून मराठवाड्याला पाणी दिले जाणार असल्याचे सांगत असले तरी याबाबतचा कोणताही प्रक ल्प अहवाल महाराष्ट्राने तयार केलेला नाही़दुसरीकडे तापी खोºयातून नवसारी येथे पाणी नेण्याबाबतचा प्रकल्प अहवाल गुजरात राज्याने युद्धपातळीवर तयार करून घेतला आहे़ गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र व गुजरात यांच्यात पाणीवाटपाचा अंतिम करार (एमओयू) करण्यासाठी गुजरात सरकार प्रयत्नशील आहे़ यासाठी केंद्र सरकार आपल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करीत असून, दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची (गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र) बैठकही पार पडली आहे़ या अंतिम करारावर महाराष्ट्राने स्वाक्षरी केल्यास ५४ टीएमसी पाण्यावर कायमस्वरूपी हक्क सोडावा लागेल, अशी भूमिका पवार यांच्यासमोर जाधव यांनी मांडली़ यावेळी आमदार जयवंत जाधव, हेमंत टकले, नरहरी झिरवाळ, वनाधिपती विनायकदादा पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या डॉ़ भारती पवार, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, प्रेरणा बलकवडे, आकाश पगार आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.