शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

उष्ण हवामानामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:02 IST

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देगावठी कोंबड्यांचेही पालक करत आहे; परंतु शेतीचा विकास होत गेल्याने या शेतीपूरक जोडधंद्यांमघ्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसाय गरज भासू लागल्याने, शेतकरी वेगवेगळ्या व्यवसात साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागल्याने खा

खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीफार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी, म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे. त्याचबरोबर या पोल्ट्री बांधकामासाठी मोठया प्रमाणात खर्च येतो. परंतु या पोल्ट्री शेड उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. परंतु यासाठी गावातील सोसायटी, बँक आदी कर्ज देऊ लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येत आहे.या पोल्ट्री व्यवसाय अनेक कंपन्या कोंबडीचे पिल्ले त्यांच्यासाठी लागणारे खाद्य आदी पुरवितात. वेळच्यावेळी कंपनीचे डॉक्टर या पोल्ट्री शेडला भेटी देऊन पिलांची देखभाल करतात. पोल्ट्री मालकाने पिलांना दररोज पाणी, खाद्य आदी संगोपन करावे लागते. याच्या मोबदल्यात पोल्ट्री मालकाला प्रतिकिलोमागे विशिष्ट कमिशन दिले जाते. तसेच सध्या पशुधन कमी झाल्याने शेतीसाठी शेणखत मिळत नाही. तेव्हा या पोल्ट्रीमुळे संगोपन म्हणून कोंबडी खत मिळते. पैसाही मिळतो आणि शेतीसाठी खतही मिळते.परंतु चालू वर्षी वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. उष्ण हवामानामुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहे. या उष्ण हवामानाचा कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत.प्रतिक्रि या : पोल्ट्री व्यवसायासाठी जास्त उष्ण किवा जास्त ठंड हवामान लागत नाही. यासाठी दमट हवामान पोषक असते. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यात उष्ण वातावरण पोल्ट्री व्यवसाय कसा करावा, याची चिंता लागलेली असल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.नितिन शेवाळे, पोल्ट्री धारक(फोटो ०१ खामखेडा)उन्हापासून पोल्ट्री फार्मवर नारळाच्या फांद्या टाकून पोल्ट्रीतील कोंबडीच्या संरक्षण केले जात आहे.