दिंडोरी : गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्गावर पेठ ते उमराळे बु. व नाशिक महानगरपालिका हद्दीपर्यंत मोठ्या आकाराचे असंख्य खड्डे पडले असून ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरु केले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून खड्डे जैसे थे आहेत. नाशिक पेठ रस्त्याच्या चौपदरीकरण कामाला मंजुरी मिळाली असली तरी अद्याप काम सुरु न झाल्याने वाहनधारक, शेतकरी यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोळशी फाटा, आश्रम शाळा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यांच्या कडा या येणाऱ्यां जाणारांसाठी व मोटरसायकलस्वारांसाठी घातक ठरत आहे. आजपर्यंत कित्त्येक अपघातात मोटरसायकलस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहे. नाशिक पेठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होवून रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असली तरी कामाला लवकर सुरु वात करावी व होणारी जीवित हानी थांबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
नाशिक-पेठ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By admin | Updated: October 10, 2015 23:12 IST