शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:35 IST

दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक बळी गेले आहेत.

ठळक मुद्देखड्डे बुजवले नाही तर ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवासी यांना सोबत घेऊन तळेगाव येथे रास्ता रोको

दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक बळी गेले आहेत.याबाबत बांधकाम विभाग झोपले असून, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने येत्या दहा दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तळेगाव दिंडोरी येथे ग्रामस्थ व शेतकरी यांना सोबत घेऊन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा तळेगाव दिंडोरीचे माजी उपसरपंच सुदाम ढाकणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या राज्य महामार्गावर ढकांबे येथे टोलनाका होता त्यावेळेस रस्ता चांगला राहिला; पण टोलनाका बंद झाल्यानंतर या रस्त्यावर खड्डे वाढत गेले. मध्यंतरी मुरूम व दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. पावसाळा सुरू आहे या नावाखाली खड्डे बुजविण्यास अडचणी येत असल्याचे व निधीही मिळत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकामकडून पुढे करण्यात आले. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून व जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन आमदार नरहरी झिरवाळ यांनी बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. त्यानंतर तात्पुरती मालपट्टी करण्यात आली. आता पाऊस उघडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागे होईल का, डांबर टाकून खड्डे बुजविण्यात येतील का, या सर्व प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधी अधिकाºयांना जाब विचारतील का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत निवेदनाच्या शेवटी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत खड्डे बुजवले नाही तर ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवासी यांना सोबत घेऊन तळेगाव येथे रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा माजी उपसरपंच सुदाम ढाकणे व ग्रामस्थांनी दिला आहे.