शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पोस्टमन, डाकसेवकांच्या समस्या केंद्राकडे मांडणार : महाडिक

By admin | Updated: November 9, 2015 00:38 IST

नॅशनल युनियन पोस्टल एम्प्लॉईजचे अधिवेशन

नाशिक : वाढते शहरीकरण आणि पोस्टल बॅँकिंग यामुळे पोस्टमन, ग्रामीण डाकसेवक व तृतीय वर्गातील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा थेट केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन तृतीय वर्गाचे राज्याचे मंडळ अध्यक्ष विलास महाडिक यांनी केले.नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन व ग्रुप डीएमटीएसच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित १७ व्या द्वैवार्षिक अधिवेशनप्रसंगी महाडिक प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ज्याप्रमाणे शहरी भागात कार्यरत असणाऱ्या पोस्टमनच्या समस्या आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण डाक सेवकांच्याही ज्वलंत समस्या आहेत. त्यांच्या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रस्तरावर जनरल मुख्य पोस्टमास्तरांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. विभागात पोस्टमन व ग्रुप डीच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भातही शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शहरी भागांमध्ये कोअर पोस्टल बॅँकिंग सेवेमुळे नागरिकांना उत्कृष्ट बॅँकिंग सेवा उपलब्ध व्हावी आणि कर्मचाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय टाळली जावी, यासाठी सर्वच डाकघरांमध्ये अद्ययावत संगणकीकृत तंत्रज्ञान असणे गरजेचे असल्याचे महाडिक म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर आर्यन गाडगीळ, रामनाथ म्हस्के, सुखदेव फरताळे, राजेंद्र शिंदे, बहिरू जाधव, आशुतोष देशपांडे, कुलदीप खर्डे, सुरेश आमराळे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मागील सभेचा अहवाल वाचून कायम करण्यात आला. ताळेबंद खर्चाला मंजुरी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पोस्टल कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)