शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘नामको’साठी दोन पॅनलची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:42 IST

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या स्थानिक बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाल गतिमान झाल्या असून, दोन पारंपरिक पॅनल तयार होण्याची शक्यता आहे. किंबहुना खूपच स्पर्धा वाढली, तर तिसरे पॅनलदेखील होण्याची शक्यता आहे.

नाशिक : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या स्थानिक बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाल गतिमान झाल्या असून, दोन पारंपरिक पॅनल तयार होण्याची शक्यता आहे. किंबहुना खूपच स्पर्धा वाढली, तर तिसरे पॅनलदेखील होण्याची शक्यता आहे.  नाशिक मर्चंट बॅँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून, चार वर्षांपासून बॅँकेवर प्रशासक नियुक्त आहेत. किरकोळ कारणावरून नियुक्त असलेले प्रशासक आता वादग्रस्त ठरू लागले असून, बॅँकेचा एनपीए वाढू लागल्याने बॅँकेच्या बाजी संचालकांनी त्याच्या विरोधात चळवळ सुरू केल्यानंतर आता गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बॅँकेने जानेवारी महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दिवाळीनंतर यासंदर्भात रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. सध्या वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, जयप्रकाश जातेगावकर, शोभा छाजेड यांचे पॅनल तयार करण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे ललित मोदी, गजानन शेलार, भास्कर कोठावदे यांच्या पॅनलच्या हालचाली वाढल्या आहेत. तूर्तास दोघांनी बिनविरोध निवडणूका होण्याच्या दृष्टीने भूमिका घेतली असली तरी तशी शक्यता तूर्तास दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. बॅँकेचे सर्वेसर्वा मानल्या जाणाऱ्या (कै.) हुकूमचंद बागमार यांचे चिरंजीव अजित बागमार यांनी पॅनल तयार करण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून हुकूमचंद बागमार यांचे नातू अ‍ॅड. आनंद बागमार यांना गिते साने यांनी पॅनलमध्ये घेण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. बॅँकेच्या राजकारणात दोन्ही पॅनल्सचे समर्थक मोठ्या प्रमाणात असले तरी बॅँकेला प्रशासकमुक्त करण्यात खारीचा वाटा आपण उचलला असे सांगणाºयांची संख्यादेखील मोठी आहे.तिसरे पॅनल शक्यहुकूमचंद बागमार आणि त्यांच्या विरोधातील मोदी पॅनल ही पारंपरिक लढत असली तरी त्यावेळी बागमार यांचे निकष आणि त्यांची ‘हुकूमत’ हा वेगळा विषय होता. आता सर्व इच्छुकांना सामावून घेणे दोन्ही पॅनलच्या दृष्टीने शक्य नसून त्याचमुळे तिसरे पॅनलदेखील तयार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक