शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सव्वाशे एकर जागेचा ताबा

By admin | Updated: January 18, 2015 02:05 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सव्वाशे एकर जागेचा ताबा

नाशिक : तपोवन सोडून अन्यत्र जाण्यास साधु-महंतांचा विरोध, तर साधुग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्यास जागामालक शेतकऱ्यांची आडकाठी त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी साधुग्रामचा तिढा सुटतो की नाही यावरून चिंतित असलेल्या जिल्हा प्रशासनाला हायसे वाटले असून, नाशिक तहसीलदारांनी ९७ शेतकऱ्यांकडील जवळपास सव्वाशे एकर जागेचा शनिवारी ताबा घेऊन तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांनी तपोवनात साधुग्रामची निर्मिती केली जावी, येथील जागांवर झालेले अतिक्रमण उद््ध्वस्त करावे अशा मागण्या करून तपोवनात सुमारे साडेतीनशे एकर जागा मिळावी यासाठी सरकारवर व पर्यायाने प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती, तर दुसरीकडे तपोवनातील जागा बाजारभावाप्रमाणे शासनाने कायमस्वरूपी संपादित कराव्यात, अशी मागणी जागामालक शेतकऱ्यांनी करून, त्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी जागा न मिळाल्यास पर्यायी जागांचा शोध घेण्यास व त्यासाठी साधु-महंतांना राजी करण्याचाही प्रयत्न एकीकडे चालविला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन जागा अधिग्रहीत करण्याबाबत नोटिसाही बजावल्या होत्या. डिसेंबर अखेर तपोवनातील जागा अधिग्रहीत करून ती महापालिकेच्या ताब्यात देण्याची व मार्चपर्यंत त्या जागेवर साधुग्राम साकारण्याची मुदतही देण्यात आली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून न्यायालयीन वादात हा प्रश्न सापडल्याने प्रशासन चिंतित झाले होते. त्यातूनच अकरा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर जागा अधिग्रहीत करण्याची व प्रसंगी एकतर्फी ताबा घेण्याची तयारी प्रशासनाने करून मोबदल्याची रक्कमही वाढून दिली होती. त्याला जागामालक शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.जागामालक शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत ६० टक्के रक्कम देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम एप्रिल महिन्यात अदा केली जाणार आहे. साधुग्रामसाठी जागा ताब्यात मिळाल्याने प्रशासनाला हायसे वाटले असून, सोमवारी महापालिकेकडे ही जागा हस्तांतरित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)