शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग सुरू नसलेले २२ भूखंड ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:47 IST

उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता नव्याने उद्योग सुरू करणाºयांना भूखंड उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सातपूर : उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता नव्याने उद्योग सुरू करणाºयांना भूखंड उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अनेक लोकांनी भूखंड घेतले होते. नियमाप्रमाणे भूखंडावर बांधकाम करून उत्पादन प्रक्रि या सुरू करणे अपेक्षित होते. परंतु घेतलेल्या भूखंडाचा वापर करण्याऐवजी हे भूखंड वर्षानुवर्षे रिक्त ठेवण्यात आले होते. एकीकडे नवीन उद्योगांसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना नवीन भूखंड मिळत नसताना दुसरीकडे अशाप्रकारचे भूखंड अडकवून ठेवण्यात येत असल्याने विकासही खुंटला आहे. त्यामुळे भूखंड विकसित न करणाºया अशा भूखंडधारकांना एमआयडीसीकडून उद्योग उभारणीसाठी वेळोवेळी सूचित करून संधी देण्यात आली होती.शिवाय अशा लोकांसाठी शासनाने ‘उद्योग संजीवनी’ योजनादेखील आणली होती. तरीही अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. उलट उद्योग व्यवसायाच्या नावाखाली सवलतीच्या दरात भूखंड घेऊन चढ्या भावाने भूखंड विक्री करण्याचे प्रकार वाढले होते. मात्र ज्या उद्देशाने भूखंड घेतला तो उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने कडक पावले उचलण्यास सुरु वात केली.२०१३ पूर्वी इमारत पूर्णत्वाचा दाखला न घेणाºया व उद्योग संजीवनी योजनेचा लाभ न घेणाºया अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ३२० भूखंडधारकांना औद्योगिक विकास महामंडळाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यातील २०० भूखंडधारकांचा समावेश होता. या नोटिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून एमआयडीसीने २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. तर काही भूखंडधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. औद्योगिक विकास महामंडळाने केलेल्या या कारवाईचे उद्योग क्षेत्रात स्वागत केले जात आहे.