गेल्या एप्रिल महिन्यात नाशिक शहरामध्ये मेडिकल ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता बंद केला होता. तसेच प्रशासनाने उद्योजकांचे सिलिंडर सुद्धा मेडिकल वापरासाठी जमा केले होते. आता शहरातली कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली असून विविध उद्योगात सुद्धा ऑक्सिजनचा वापर अत्यावश्यक ठरतो. ऑक्सिजनअभावी अंबड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वायू वापराची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सकारात्मकता दर्शवत संबंधीत अधिकाऱ्यांना त्यावर आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
कोट===
एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वेगाने वाढली होती. बहुतांशी सर्वच रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा हा उद्योग क्षेत्राला करताना अडचणी येत होत्या. परंतु आता रुग्णसंख्यादेखील कमी झाली असून ऑक्सिजनचा साठा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शासनाने परवानगी दिल्यास उद्योजकांना त्वरित ऑक्सिजन पुरवठा केला जाईल.
- अमोल जाधव, संचालक, पिनॅकल गॅस
गॅस वितरक