शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पॉझिटिव्हिटी रेट अवघा १०.४४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दि. १२ ते २३ असा बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत ...

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दि. १२ ते २३ असा बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत मेडिकल्सची दुकाने, ऑक्सिजन प्लॅन्ट, वैद्यकीय सेवेशी संबंधित व्यवसाय तसेच रुग्णालये वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. दि. १६ ते २२ मे या कालावधीत १८४० रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४४१ इतकी होती. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजाराच्या घरात असताना त्यामध्ये हळूहळू घट होण्यास सुरुवात झाली आणि याच काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

मे महिन्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा तब्बल २३.७१ टक्के इतका होता. रुग्णसंख्या वाढल्यामुळे बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकची परिस्थिती गंभीर बनल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील बावीस दिवसात पॉझिटिव्हिटी रेट २३.७१ टक्क्यांवरून १०.४४ टक्क्यांवर आला आहे. याचाच अर्थ १३.२७ टक्क्यांनी कोरोन‍ाची लागण होण्याचे प्रमाण घटले आहे.

--इन्फो--

१६ ते २२ मे या कालावधीत कोरोनाची स्थिती...

कोरोना चाचणी - १४१०९

पाॅझिटिव्ह रुग्ण - १४४१

मृत्यू - ३८

डिस्चार्ज - १८४०

ॲक्टिव्ह रुग्ण - १७ हजार ६०५

पाॅझिटिव्हिटी रेट - १०.४४