शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाबाबत सकारात्मक निर्णय

By admin | Updated: July 22, 2016 01:02 IST

स्मृती इराणी : यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाची वस्त्रोद्योगमंत्र्यांशी चर्चा

आझादनगर (मालेगाव) : यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती इराणी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार आसीफ शेख, भिवंडीचे कपील पाटील, मालेगाव भाजपा महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांचा समावेश होता. पावसाळी अधिवेशन संपताच देशातील सर्वच वस्त्रोद्योग संघटनांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही श्रीमती स्मृती इराणी यांनी शिष्टमंडळास दिली. विविध कारणांमुळे बाजारपेठेत आलेली मंदी, याशिवाय सुताच्या भावात झालेली भरमसाठ वाढ यामुळे कच्च्या मालात तेजी व तयार मालास मागणीअभावी कमी भाव मिळत असल्याने यंत्रमाग व्यवसाय दिवसेंगणिक तोट्यात जात असल्याची माहिती शिष्टंमंडळाने यावेळी स्मृती इराणी यांना दिली. शासनाच्या अनुदानाविना रोजगार उपलब्ध करून देणारा देशातला दुय्यम उद्योग असूनही अखेरच्या घटका मोजत आहे. यामुळे केंद्र सरकारने कापड निर्यात धोरणात बदल करुन इतर देशातील कापडामुळे भारताच्या कपड्याला जास्त मागणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. राज्य सरकारकडून मागील एक वर्षाचे वीज बिल माफ करावे. प्रति यंत्रमाग ५० हजाराचे अनुदान द्यावे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी साजीद अन्सारी, मुकेश झुनझुनवाला, भिवंडीचे शोएब गुड्डू, मौलाना अय्युब कासमी, महेमुद खान, अ‍ॅड. हिदायतउल्लाह मोहंमद जाफर पानवाला, मौलाना जाहीद नदवी यांचा शिष्टमंडळात समावेश होता. (वार्ताहर)