शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

अधिकाऱ्यावर पदे, वेतनाची खैरात

By admin | Updated: July 22, 2014 01:18 IST

मनमानी : पात्रता नसतानाही दिली पदोन्नती; नियुक्ती वर्ग तीनची वेतन मात्र वर्ग दोनचे

 संदीप भालेराव ल्ल नाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठातील आर्थिक अनियमितता तर समोर आलीच असून, विद्यापीठाने मर्जीतील अधिकाऱ्यांवर मेहरनजर दाखविण्यात आल्याचे अनेक प्रकारही समितीच्या निदर्शनास आले आहेत. माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी, परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी, याच विभागातील अकौंटंट, तसेच आंतरविद्यापीठ डेप्युटेशन देताना कोणतेही निकष पाळले नसल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याचे समजते. आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन असो व भत्ते, त्याचप्रमाणे त्यांची पदोन्नती किंवा कालबद्ध पदोन्नती या साऱ्या प्रकरणात विद्यापीठाने प्रचंड अनागोंदी कारभार केल्याचे समितीचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच कुलसचिव निवड प्रक्रियेवर लेखी आक्षेप आल्यानंतर कुलगुरूंनी केवळ ‘लॉयल’ हीच पात्रता असल्याचे तक्रारकर्त्यांना खासगीत सांगितल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. यावरून विद्यापीठात मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पायघड्याच घातल्या जात असाव्यात असेच दिसून येते.नियमानुसार विद्यापीठात डेप्युटेशनवर पदोन्नती देता येत नसतानाही विद्यापीठाने असा आगाऊपणा केला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. प्रारंभी काही सहायक कुलसचिवांना उपकुलसचिव पदावर पदोन्नती देण्यात आली. ही बाब शासनाच्या वेतनपडताळणी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर ज्या चार सहायक कुलसचिवांना उपकुलसचिव म्हणून बढती दिली होती, त्यांना पदावनत करण्यात आले. मात्र त्यांना देण्यात आलेल्या उपकुलसचिवपदाच्या वेतनश्रेणीची वसुली करण्यात आलेली नाही. अशी वसुली का करण्यात आलेली नाही, याविषयी समितीने कुलगुरूंना विचारणा केली असल्याचे समजते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची कोणतीही परवानगी नसताना येथील उपकुलसचिवांना आयोगाच्या निकषाप्रमाणे वेतन अदा केले जात आहे. सदर वेतन हे नियमबाह्य असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच शासनाने त्यांची वेतनपडताळणी केली होती. त्यांच्याकडून कोट्यांवधींची वसुली होऊ शकते असा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. त्यांच्या वेतनातून दरमहा सुमारे ४० हजार रूपये सहा वर्षांसाठी कपात केल्यास शासनाकडून लाटण्यात आलेले वेतन वसूल करणे शक्य असल्याचा अहवाल यापूर्वीच सचिवांना सादर झालेला आहे. आताच्या आॅडीटमध्येही सदर बाब नोंदण्यात आली आहे. सन २००२ पासून विद्यापीठामध्ये झालेली कर्मचारी भरतीतील संशयास्पद कागदपत्रे समितीने जप्त केल्याचेही समजते. या कागदपत्रांवरून अपात्र उमेदवारांना मोठ-मोठ्या पदांवर पदोन्नती देण्यात आल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामध्ये वित्त अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरदेखील समितीने आक्षेप घेतला असल्याचे समजते. क्लार्क म्हणून डेप्युटेशनवर आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत थेट सुपर क्लासवन पदावर म्हणजेच वित्त अधिकारी पदी कसे विराजमान करण्यात आले, यावर समितीने आक्षेप घेतला आहे. काही अधिकाऱ्यांना तीन-तीन लॅपटॉप, एकापेक्षा अधिक इंटरनेट कनेक्शनचेही लाभ देण्यात आलेले असल्याची बाबही लेखा परीक्षणात उघड झाली आहे. अन्य एक महत्त्वाची बाब समितीच्या निदर्शनास आल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये फंडातून वर्ग तीनवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे प्रस्ताव पाठविताना वर्ग दोनच्या स्केलसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. प्रत्यक्षात ते वर्ग तीनवर काम करीत आहे. अशा प्रकारे वर्ग दोनचे वेतन हे कर्मचारी लाटत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी वयाची अट ओलांडलेली असतानाही त्यांनाही सामावून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने विद्यापीठातील अनागोंदीने कळस गाठला असल्याचे दिसून येते. (क्रमश:)