देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षट्कोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, परिसरात गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, शाळेच्या एकाच इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.कोविड प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये गेल्या मार्चपासून बंद आहेत. ३० सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात शाळेमध्ये बसायला पुरेशी जागा नसल्याने विद्यार्थी येत नाही.परिणामी, विद्यार्थिसंख्येत घट होऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. सद्य:स्थितीत देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेची एकच इमारत सुस्थितीत असून, त्यामध्येच पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोंबून अध्ययन केले जाते. देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेची षट्कोनी इमारत सुस्थितीत नसून तीची अवस्था बिकट झाली आहे. भविष्यात केव्हाही शाळा होतील तेव्हा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बसायचे कसे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या शाळेच्या इमारतीचे त्वरित नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सन २००७-०८ ते २००८-०९ मध्ये जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्चून शाळेसाठी दोन षट्कोनी इमारती बांधल्या होत्या. आज बावीस वर्षांनंतर त्या शाळांची अवस्था नाजूक झाली असून, स्लॅबमधून पाणी गळतेय, खिडक्यांची दुरवस्था झाली असून, इमारत वापरण्यायोग्य नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या शाळेच्या इमारतींचे नूतनीकरण होत नाही. विद्यार्थ्यांची परवड लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:15 IST
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षट्कोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, परिसरात गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, शाळेच्या एकाच इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
देवगाव शाळा इमारतीची दुरवस्था
ठळक मुद्देछतगळती : नूतनीकरण करण्याची पालकांची मागणी