शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

By admin | Updated: September 13, 2016 01:00 IST

पाडळीत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन

 सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात इकोफ्रेंडली गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे शेतकरी आत्महत्त्येबाबत जनजागृती केली. विद्यालयात बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे शाळेच्या आवारातच पाण्याने भरलेल्या एका मोठ्या पातेल्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी सविता देशमुख यांनी गणेशपूजनाचे धार्मिक महत्त्व व काळाची गरज याबाबत माहिती दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिस व रासायनिक रंगांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे आर. टी. गिरी यांनी सांगितले. टी. के. रेवगडे, के. डी. गांगुर्डे यांनी शेतकरी आत्महत्त्येसंदर्भात चलचित्र सादर करून बळीराजाच्या व्यथा शेतकऱ्यांसमोर मांडल्या. पर्यावरणास हानी न पोहचवता सण साजरे करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे शेतकरी आत्महत्त्येच्या कारणांवर प्रकाशझोत टाकत जनजागृती केली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आजचा गणेशोत्सव व तरुण पिढी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बी. आर. चव्हाण, आर. टी. गिरी, एस. एम. कोटकर, मलेका शेख, सी. बी. शिंदे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)