येवला : प्रदूषणमुक्त दिवाळी उपक्रमांतर्गत येवल्यातील एन्झोकेम विद्यालयाने सहभाग नोंदवला. दिवाळीतील फटाक्यांचा आवाज व धूर यांनी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून सामाजिक उपक्र माद्वारे दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थिनींनी घेतली.फटाकेमुक्त दिवाळी उपक्र म एन्झोकेम विद्यालयात साजरा करण्यात आला. हा उपक्र म साजरा करतांना फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण, हवेचे प्रदूषण याबद्दल माहिती देण्यात आली. प्रदूषणामुळे मानवाला, मुक्या प्राण्यांना, लहान मुलांना होणारे त्रास याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी, तसेच दिवाळीची मजा लुटताना इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव ठेवावी, असे सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक अध्यक्ष पंकज पारख यांनी सांगितले. यावर्षीपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून फटाक्यांच्या पैशातून गरीब व अनाथांना कपडे व मिठाई देऊ या, अशी प्रतिज्ञाही एन्झोकेम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यावेळी घेतली. उपक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य रामदास कहार, उपप्राचार्य पर्यवेक्षक डी. जी. महाले प्रा. आर. बी. गायकवाड, प्रा. एम. पी. गायकवाड, प्रा. कैलास धनवटे, प्रा. दत्तात्रेय उटावळे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
प्रदूषणमुक्त दिवाळी करण्याची प्रतिज्ञा
By admin | Updated: October 27, 2015 23:36 IST