शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 23:54 IST

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज मतदान

दिंडोरी : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १०) मतदान होत असून, पक्षीय उमेदवारांबरोबरच अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांनी शेवटपर्यंत किल्ला लढवत ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच लढती चुरशीच्या बनल्या आाहेत. कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदार नेमके कुणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.दिंडोरी नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी ९१ उमेदवार रिंगणात असून, त्यात ५१ पक्षीय, तर ४० अपक्षांचा समावेश आहे. मावळत्या ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदिंचा यात समावेश असून, अनेक नवखे उमेदवारही रिंगणात आहेत. अनेक लढती भावकीत होत असल्याने रंगत वाढली आहे. शिवसेना सर्वाधिक १६ जागांवर लढत असून, एका प्रभागात अपक्षाला पुरस्कृत केले आहे. भाजपा १४ जागा लढत आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करत अनुक्रमे दहा व सहा जागांवर लढत आहे. शिवसेनेतर्फे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभा झाल्या, तर माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत प्रत्येक प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार अनिल कदम हेही प्रचारात उतरले आहेत. भाजपातर्फे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही प्रचारात उडी घेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले आहे.राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी एकत्रित सर्व प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेत सत्ता देण्याचे आवाहन केले . कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनीही प्रचार शुभारंभ सभेत मतदारांना विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. यासोबतच दिंडोरीतील सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या पक्षाची सत्ता यावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, कॉँग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर, भाजपाचे नेते चंद्रकांत राजे, शिवाजीबाबा पिंगळ, शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले, बंडू शिंदे, रमेश बोरस्ते, मनसेचे मनोज ढिकले त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विजय देशमुख, माजी सरपंच प्रमोद देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, दिलीप जाधव, शिवाजी जाधव, प्रीतम देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास मवाळ, सतीश देशमुख, बाळासाहेब आंबेकर आदिंच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (वार्ताहर)