शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून मतदान केंद्रांचे सर्वेक्षण

By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST

निवडणूक तयारी : सोयीसुविधांचा आढावा

 नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरात उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांचे सर्वेक्षण प्रशासनाने सुरू केले असून, केंद्राच्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. सर्वेक्षणात प्रामुख्याने, महापालिकेच्या शाळा इमारतींमध्ये मूलभूत सोयीसुविधांबाबत अडचणी निदर्शनास येत आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी यंदा सुमारे १३५० मतदान केंद्रांची संख्या राहण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी चालविली आहे. मागील निवडणुकीत ९ लाख ६९ हजार मतदारांची संख्या होती. यंदा, महापालिकेने नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने सुमारे सव्वा लाख मतदारसंख्या नव्याने वाढली आहे. त्यामुळे यंदा मतदान केंद्रांच्याही संख्येत वाढ होणार आहे. प्रामुख्याने, १३५० च्या आसपास मतदान केंद्रे असण्याची शक्यता असून, प्रत्येक बूथवर ७५० ते ८५० मतदारसंख्या असणार आहे. शहरात उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची यादी संकलित केल्यानंतर महापालिकेने आता बांधकाम विभागामार्फत केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा आहेत किंवा नाही, याबाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बांधकाम विभागाने त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून, पथकामार्फत माहिती संकलित केली जात आहे. मतदान केंद्रांसाठी महापालिकेच्या शाळा इमारतींसह खासगी शाळांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सुरक्षास्थिती, अपंग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, खोल्यांची स्थिती या साऱ्या मूलभूत सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. सदर सर्वेक्षणात महापालिका शाळांच्या इमारतींमध्ये बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असल्याचे निदर्शनास आले आहे, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. बव्हंशी ठिकाणी रॅम्पचीही सुविधा नाही. मनपा शाळा इमारतींच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये मात्र सर्व सुविधा आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणात आढळून येणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन सदर मतदान केंद्रांच्या ठिकाणी सोयीसुविधांवर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)