शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

आयमा निवडणुकीसाठी २९ रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:21 IST

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या गुरुवार (दि. १७) पासून उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने उद्योजक वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार आधीच घोषित करण्यात आले असून, इतर पदांसाठीचे उमेदवारदेखील लवकरच घोषित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  आयमा पदाधिकाºयांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, आयमाच्या २०१८-२० या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १७ तारखेपासून निवडणुकीस प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, त्यादृष्टीने सत्ताधारी एकता पॅनल व दुसºया गटाच्या उमेदवारांकडून हालचालींना वेग आला आहे. सदरची निवडणूक ही मागील निवडणुकीप्रमाणेच बिनविरोध करण्यासाठी आयमाच्या माजी पदाधिकाºयांकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु सत्ताधारी व दुसरा गट यांच्यात जर समझोता झाला नाही तर एकता पॅनलच्या दुसºया गटाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार उद्योजक तुषार चव्हाण हे राहणार असून, यामुळे समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी का होईना ही निवडणूक होईल, अशी चर्चा आहे. सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने दुसºया गटाने यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. यावर या दोन्ही गटांत समझोता करण्यासाठी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापही समझोता झाला नसल्याचे समजते. आयमाची २०१८-२० या कालावधीसाठी येत्या २९ मे रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, ३१ मे राजी नवीन अध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले आहे.समझोता नाहीसत्ताधारी एकता पॅनलने वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असल्याने दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण व त्यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. मागील निवडणुकीत अध्यक्षपदाचा शब्द दिला असतानाही पुन्हा डावलण्यात येत असल्याचा आरोप तुषार चव्हाण गटाकडून करण्यात येत असून, सत्ताधारी एकता गटाकडून मागील दोन वर्षांत संघटनेच्या कोणत्याही बैठका, तसेच इतर कामांसाठी कोणतेही योगदान दिलेले नसल्याने तुषार चव्हाण यांना अध्यक्षपद मागण्याचा अधिकार नसल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटांत समझोता न झाल्यास अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक