शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ जानेवारीला कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:18 IST

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.

ठळक मुद्देअभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर येथील रणांगणात चुरस

कळवण : तालुक्यातील अभोणा, कनाशी, पाळे बु., सप्तश्रृंगगड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी गटातटात, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूमीवर गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्येष्ठ मंडळी प्रयत्नशील आहेत. युवावर्गात मात्र निवडणूक लढविण्यासाठी बळ दिले जाणार असून, गावागावांत आता गटातटाचे राजकारण होणार आहे.कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशी, ओतूर, पाळे बु., सप्तश्रृंगगड, नांदुरी, मेहदर, नरूळ, भुसणी, मुळाणेवणी, बापखेडा, तताणी, मोहनदरी, भगुर्डी, पळसदर, मोहमुख, ओझर, लिंगामे, वीरशेत, वडाळे(हा), बोरदैवत, जामलेवणी, कळमथे, सावकीपाळे, बिलवाडी, देवळीवणी, कुंडाणे(क), काठरे, गोसराणे या महत्त्वपूर्ण गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.नामनिर्देशन पत्र ३० डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. १५ जानेवारीला मतदान -कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायती निवडणुकांसाठी नामनिर्देशन दि. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहे. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्य धरणार-विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत,

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक