शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे सर्वेक्षण : शिवसेना गटनेत्याच्या प्रभागात सर्वाधिक प्रमाण५८ टक्के कुटुंबांकडून कचºयाचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:12 IST

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे नागरिकांना अनिवार्य करण्यात आल्यानंतर शहरातील सुमारे ५८ टक्के कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नाशिक : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे नागरिकांना अनिवार्य करण्यात आल्यानंतर शहरातील सुमारे ५८ टक्के कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. नाशिक पश्चिम व पंचवटी विभागातून अद्यापही बव्हंशी कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, महापौरांच्या प्रभागातील ४८ टक्के कुटुंबीय कचºयाचे वर्गीकरण करत आहेत, तर शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या प्रभागातील सर्वाधिक ९३ टक्के कुटुंबीय कचºयाचे वर्गीकरण करत आहेत. आता उर्वरित ४२ टक्के कुटुंबीयांनाही कचरा वर्गीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.महापालिकेने खतप्रकल्प खासगीकरणातून चालविण्यास दिला असून, जानेवारी २०१७ पासून खासगी कंपनीद्वारा तो कार्यान्वित झाला आहे. सध्या खतप्रकल्पावर सुमारे ५२५ टन कचरा येत आहे. खतप्रकल्पावर ओला व सुका कचरा वेगळा करत त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आहे. तसेच महापालिकेने घंटागाडीचा नव्याने ठेका देताना ठेकेदारांनाही घंटागाडीत ओला व सुका कचरा यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, जवळपास सर्वच घंटागाडी ठेकेदारांनी ओला व सुका कचºयाच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मुळात नागरिकांनीच घंटागाडीत कचरा टाकताना तो ओला आणि सुका असा वेगळा करून द्यायचा आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतंत्र दोन डस्टबिन ठेवणे अनिवार्य आहे. बव्हंशी नागरिकांकडून एकत्रित कचराच घंटागाडीत टाकला जातो. त्यात शिळ्या अन्नपदार्थापासून ते घरातील भंगार साहित्य, जुने कपडे, प्लॅस्टिक पिशव्या व बाटल्या यांचा समावेश असतो.