शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:49 IST

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधितांची शौचालये ही कागदोपत्री गायब करण्यात आली असून, आता अपात्र ठरविण्यात आलेले सदस्य जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधितांची शौचालये ही कागदोपत्री गायब करण्यात आली असून, आता अपात्र ठरविण्यात आलेले सदस्य जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत. पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.  सुमन युवराज गातवे, उमेश लालू बेंडकोळी आणि जीवन नामदेव गातवे अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. उपोषणास बसलेल्या सुमन गातवे यांनी सांगितले की, २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही निवडून आलो होतो. त्याचवेळी आमच्याकडे शौचालये असून, त्याचा वापर करीत असल्याचा अभिप्राय गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिला होता. त्याच बळावर आपण निवडणूकही जिंकली. २०१५ आणि २०१८ मध्येही ग्रामपंचायतीने शौचालय असल्याचा दाखला दिला आहे.याप्रकरणी राजकीय फायद्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी विसंगत आणि खोटे दाखले दिल्याचा आरोप करीत सुमन गातवे यांच्यासह उमेश बेंडकोळी, जीवन गातवे, दत्तू काळे, शिवाजी काळे, पंढरीनाथ काळे, राजाराम काळे, जगन बेंडकोळी, किरण डगळे, युवराज गातवे, श्यामराव कुलाळ, बाळसाहेब माळी या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांची भेट घेऊन दोन्ही अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली.  याप्रकरणी गिते यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही तोपर्यंत उपोेषण सुरूच ठेवण्याचा इशारा सुमन गातवे यांनी दिला आहे.  १८ नोव्हेंबर रोजी गातवे यांच्या विरोधातील तीन सदस्यांनी जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल करून गटविकास अधिकारी किरण जाधव आणि ग्रामसेवक वर्षा घिसाडी यांनी दिलेला शौचालय नसल्याचा अभिप्राय जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकाºयांनी घेतली तेव्हा सुमन गातवे, उमेश बेंडकोळी आणि जीवन गातवे यांनी संबंधित अधिकाºयांनीच आपणाला शौचालय असल्याचा दिलेला दाखल सादर केला. गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दिलेला विसंगत अहवाल पाहून जिल्हाधिकाºयांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश उभयताना दिले होते. मात्र त्यांनी मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी वरील तीनही सदस्यांना अपात्र ठरविल्यामुळे विरोधकांनी सरपंच, उपसरपंचांची निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत