शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद बांधकाम नियंत्रण नियमावलीवरही राजकारण

By admin | Updated: February 11, 2017 00:32 IST

भाजपा म्हणते बनावट : जाधवांची त्यावरही टीका

 नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेल्या बांधकाम नियमावरून आता राजकारण सुरू झाले आहे. भाजपाला बदनाम करण्यासाठी हे षड््यंत्र असल्याची टीका करतानाच आमदार बाळासाहेब सानप यांनी नियमावली अद्याप मंजूर नसल्याचा दावा केला. दुसरीकडे संशयास्पद असलेल्या या नियमावलीला खरे गृहीत धरून राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी थेट टीका केली आहे. त्यामुळेच ही नियमावली राजकारणात अडकल्याचे दिसून येत आहे.शहर विकास आराखड्याचा पहिला टप्पा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झाला. परंतु बांधकाम नियंत्रण नियमावलीच मंजूर झाली नाही ती स्वतंत्रपणे मंजूर केली जाईल, असे विकास आराखडा प्रसिध्द करताना शासनाने म्हटले होते. तर बांधकाम नियंत्रण व विकास नियमावली प्रसिध्द करण्यासाठी राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत व्हॉट्स अ‍ॅपवर नियमावली व्हायरल झाली. गुरुवारी ही फाईल व्हायरल झाली असून, २०६ पानांच्या नियमावलीच्या शेवटी कोणाचाही स्वाक्षरी नाही. त्यामुळे ही नियमावली खरी की खोटी या विषयावर संशय आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीदेखील नियमावलीत मंजुरीची अधिकृत प्रत नसल्याचे म्हटले आहे.यासंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी अद्याप नियमावली मंजूर नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपाला अडचणीत आणण्यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ही नियमावली खरी किंवा खोटी याबाबत संशयास्पद आहे. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी आराखड्यावर टीका केली असून, या नियमावलीतील तरतुदी म्हणजे सर्वसामान्य नाशिककरांवर सरकारने न कळत टाकलेला दरोडा असल्याचे म्हटले आहे. जाधव यांच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संशयास्पद नियमावलीवर राष्ट्रवादीने राजकारण सुरू केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.