शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:37 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी व अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे चुरस निर्माण झाली असून, या अपक्ष व बंडखोरांना उभे करण्यामागे राजकीय पक्षांचाही अप्रत्यक्ष हातभार लागला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत चुरस : काहींना बसविण्याचे, तर काहींना छुप्या मदतीने रसदा 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी व अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे चुरस निर्माण झाली असून, या अपक्ष व बंडखोरांना उभे करण्यामागे राजकीय पक्षांचाही अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. सोमवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून काही अपक्ष, बंडखोरांना माघार घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असून, काहींनी उमेदवारी कायम ठेवून रिंगणातच राहावे यासाठी छुपी रसद पुरविली जात आहे.रविवारी दिवसभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या संदर्भातील हालचाली गतिमान झाल्या होत्या. शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसानंतर सर्वच मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले. छाननीनंतर २१२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, त्यातील राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार वगळल्यास अपक्ष व बंडखोरांचीच संख्या अधिक आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यामुळे चुरस निर्माण झाली असून, प्रत्येक उमेदवाराला एकेक मताची गरज आहे. अशा परिस्थितीत सामाजिक, जातीय मतांची विभागणी होऊ नये याची काळजी प्रत्येक उमेदवार घेत आहे. त्यामुळे मतांची कमीत कमी फाटाफूट व्हावी असा काहींचा प्रयत्न आहे तर काहींना अपक्ष, बंडखोरांची उमेदवारी पथ्यावर पडणार असल्याने त्यांनी अशा उमेदवारांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसैनिकांची भावना लक्षात घेता, पक्षाने सांगितले तरी थांबायचे नाही अशा मन:स्थितीत इच्छुक असल्याचे जाणवले. तिघांपैकी कोणा एकाला पुढे करून निवडणूक लढविण्यासाठी दिवसभर बैठका व हालचाली सुरू होत्या. नांदगाव मतदारसंघातून माजी आमदार संजय पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पवार यांचे सेना व भाजपशी असलेले संबंध पाहता त्यांची उमेदवारी सेनेला मारक ठरू शकत असल्याने पवार यांनी रिंगणातच राहावे यासाठी राष्टÑवादीकडून प्रयत्न केले जात होते, तर चांदवड-देवळा मतदारसंघातही देवळा तालुक्यातील तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, चांदवडमधून एकच उमेदवार आहे. अशा परिस्थितीत प्रांतवादाचा फटका भाजपला बसू शकतो हे हेरून कॉँग्रेसकडून देवळ्यातील उमेदवारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जात होता. दिंडोरी मतदारसंघाबाबतही अशीच परिस्थिती असून, उमेदवारी न मिळाल्याने सेनेतील नाराजी कायम राहावी यावर राष्टÑवादी लक्ष ठेवून आहे. नाशिक पूर्वमधील राजकीय घडामोडींना वेगनाशिक शहरातील पूर्व मतदारसंघात राष्टÑवादीविरुद्ध भाजप असा सरळ सामना व्हावा यासाठी रविवारी राष्टÑवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करण्यात आले, तर मनसेचे अशोक मुर्तडक यांनाही थांबवून जातीय मतविभागणी रोखण्यासाठी हालचाली करण्यात आल्या आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या तिघा बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याने भाजपची अडचण झाली आहे. बंडखोरांनी थांबावे यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सेनेच्या नेत्यांशी संपर्क सुरू होता.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक