शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली

By admin | Updated: January 10, 2016 23:51 IST

आरोग्य विद्यापीठ : उद्या जाहीर होणार यादी; राज्याबरोबरच केंद्रातूनही दबाव आणण्याचा प्रयत्न

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरूपदासाठी प्राप्त अर्जांची छाननीप्रक्रिया शुक्रवारी पार पडल्यानंतर मंगळवार, दि. १२ रोजी अंतिम ११ उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी राज्य, तसेच केंद्रातील मंत्र्यांचीदेखील मध्यस्थी वापरण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे समजते. कुलगुरूपदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वापरण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने काही इच्छुकांनी निवड समिती मेरीटऐवजी राजकीय वर्चस्वच ग्राह्य धरणार आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी गेल्या शुक्रवारी अर्जांची छाननी करण्यात आली. कुलगुरूपदासाठी अर्ज केलेल्या सुमारे २६ अर्जांपैकी अंतिम ११ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, मंगळवारी ही नावे जाहीर केली जाणार असल्याचे समजते. अर्ज दाखल केल्यापासून याप्रकरणी राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर दिल्ली दरबारीदेखील अनेकांनी धाव घेतल्याचे समजते. असे असले तरी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र आता या निवडप्रक्रियेत महसूलमंत्री एकनाथ खडसे, तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील काही नावांसाठी प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त आहे. निवड समितीमध्ये आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे डॉ. निखिल टंडन, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट चंदीगढचे डॉ. योगेश चावला असल्याने या दोघांवर दिल्लीतून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे, तर राज्यातून मुख्यमंत्र्यांपासून इतर मंत्रीगणही कामाला लागल्याने एकूणच कुलगुरूपदासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कालपर्यंत जी नावे चर्चेत होती त्यामध्ये आणखी काही नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यामध्ये पुणे आणि मुंबईच्या दोन नावांची चर्चा आहे. यातील एक राज्यातील एका मंत्रीमहोदय यांचे नातेवाईक असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून काही इच्छुकांनी प्रयत्न चालविले आहेत. यातील दोन उमेदवार हे मंत्रीमहोद्वयांचे नातेवाईक असून, त्यांनी कुलगुरूपदासाठी राजकीय ताकदपणाला लावली आहे. तर कुलगुरूपदासाठी असलेली चुरस लक्षात घेता राजकीय मानापमान टाळण्यासाठी महिला उमेदवाराची निवड करण्यात यावी, असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे. अर्थात याबाबतचे दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहेत. (प्रतिनिधी)