छावणी परिषदेच्या २०१४ साली झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा पक्षीय चिन्हावर भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवून आठपैकी सहा जागा मिळवल्या तर शिवसेना व अपक्ष एक एक जागेवर निवडून आले होते. पाच वर्षानंतर सहा, सहा महिन्यांची दोन वेळा छावनी परिषदेला मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र बोर्डाच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, बोर्डावरच व्हेरी बोर्ड म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, कावेरी कासार, तानाजी करंजकर, शिवसेनेचे तानाजी भोर, अनिता जगदीश गोडसे यांची नावे चर्चेत आहेत. बोर्डावर निवडीबाबत छावणी प्रशासनाकडून अर्ज घेतल्यानंतर निवडक उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते व तीन नावे पाठवली जातात. खासदारांनी दिलेल्या शिफारसीवर निवड अंतिम होते. थेट नियुक्तीनंतर कधी छावणी परिषदेच्या निवडणुका होतील तोपर्यंत निवड राहू शकते. छावनी प्रशासनाकडे या संदर्भात पुढील कार्यवाहीची माहिती नसली तरी इच्छुकांच्या मात्र दिल्ली, मुंबई, पुण्याला चकरा वाढल्या आहेत.
छावणी परिषदेवर नियुक्तीसाठी राजकीय हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST