शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजकीय हालचाली गतिमान

By admin | Updated: October 1, 2015 00:05 IST

नगरपालिका निवडणूक : आजपासून उमेदवारी अर्ज

कळवण : नगरपंचायतच्या १७ जागांसाठी गुरुवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून, आॅनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरले जाणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ उडणार असून, सायबर कॅफेवर आजपासून उमेदवारांची गर्दी होणार आहे.राजकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून, पक्षपातळीवर बैठकीनी वेग घेतला आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहेकळवण नगरपंचायतसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार असून, २ नोव्हेंबरला कळवण नगरपंचायतमधील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी कळवण नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला असून, कळवण नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात २९ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.कळवण नगरपंचायतच्या १७ जागांसाठी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत मतदान होणार आहे, तर २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक रहाणार आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणीकरिता पडताळणी स्ािमतीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे ,अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून ६ मिहन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाणार आहे, तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत कळवण नगरपंचायतच्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे कळवण नगरपंचायत निवडणूक कार्यक्र म घोषित करण्यात आला असून आज १ आॅक्टोबर पासून ८ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून उमेदवार अर्जाची छाननी ९ आॅक्टोबर रोजी होणार असून १९ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.२६ आॅक्टोंबर रोजी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, १ नोव्हेंबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे अशी माहिती कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली कळवण तहसील कार्यालयात आज सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कळवण नगरपंचायतच्या संदर्भात बैठकीचेआयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)