शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निकालाने बदलणार राजकीय समीकरणे

By admin | Updated: August 30, 2016 01:52 IST

भाजपाची सेनेला चपराक : ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा

नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने अनपेक्षितरीत्या विजय संपादन केल्याने पुढील वर्षी फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत भाजपाने दोन्ही जागांवर विजय मिळवून शिवसेनेला चपराक दिली असून, सेना आणि मनसे उमेदवारांनी घेतलेली मते पाहता भाजपाला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा मात्र सुरू झाली आहे. महापालिकेच्या प्रभाग ३५ आणि ३६साठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीचा निकाल आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी वातावरणनिर्मितीकरिता महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रारंभी शिवसेना व मनसेचा पोटनिवडणुकीत प्रभाव राहील अशी चर्चा सुरू असतानाच भाजपाने दोन्ही ठिकाणी मुसंडी मारून अनपेक्षितरीत्या यश संपादन केले आहे. त्यामुळे भाजपाच्या गटात उत्साहाला उधाण आले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाने आगामी काळात राजकीय समीकरणांच्या बदलाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे कमळ फुलल्याने भाजपाकडे इच्छुकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची दारुण अवस्था झाल्याने आगामी काळात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याचीही भीती व्यक्त होत आहे. प्रभाग ३६ मध्ये कॉँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी त्यासाठी पक्षापेक्षा उमेदवाराचा व्यक्तिगत संपर्क कामी आला. त्यामुळे कॉँग्रेस पक्षानेही हुरळून जाण्याची गरज नाही. परिणामी, कॉँग्रेसच्याही गोटात फुटीची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीत शिवसेनेनेही जोर लावला होता. किंबहुना सेना उमेदवारांच्या पदरात यश पडेल, अशी हवा निर्माण झाली होती. परंतु भाजपाने मुसंडी मारत सेनेलाही जोरदार चपराक लगावत आगामी सामना आपल्याशीच होणार, याची जाणीव करून दिली आहे. सत्ताधारी मनसेच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी झुंज दिली असली तरी त्यांच्या मतांचा घटलेला टक्का हा मनसेची जादू संपल्याचेच निदर्शक मानला जात आहे. पोटनिवडणुकीत सेना-मनसे उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)