शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणांच्या संपादनासाठी धोरण निश्चिती

By admin | Updated: August 21, 2016 01:56 IST

समिती गठित : प्राधान्यक्रम ठरविण्याचे खाते प्रमुखांना आदेश

नाशिक : विकास आराखड्यातील २३४ आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला सुमारे ४ हजार ९०० कोटी रुपये निधीची गरज भासणार आहे. मात्र निधीअभावी जागा संपादनात येणारे अडथळे, कलम १२७ अन्वये सादर होणाऱ्या नोटीसांचे वाढते प्रमाण, वाढीव मोबदल्याची होणारी मागणी या सर्व बाबींचा विचार करुन महापालिका प्रशासनाने आरक्षणांच्या संपादनासाठी एक धोरण तयार करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून शनिवारी समितीच्या बैठकीत आरक्षणांसंबंधी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश संबंधित खातेप्रमुखांना देण्यात आले. नाशिक महापालिकेचा विकास योजना आराखडा १९९३-९४ मध्ये तीन टप्प्यात मंजूर झाला. त्यामुळे २२ वर्षांच्या कालावधीत नियोजन करुन आरक्षण ताब्यात घेणे गरजेचे होते. परंतु पुरेशा आर्थिक तरतुदी अभावी आरक्षणे ताब्यात घेण्यात अडथळे येत गेले. त्यातच नवीन भूसंपादन कायद्यानुसार दुप्पट मोबदला प्राप्त होत असल्याने कलम १२७ नुसार खरेदी नोटीस देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरक्षण व्यपगत होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. जागा मालकांकडून टीडीआर, एफएसआय, ए.आर आदी स्वरुपात मोबदला घेण्यास उत्सुकता दाखविली जात नसल्याने रोख मोबदला देणे क्रमप्राप्त ठरत आहे. सदर आरक्षणांच्या संपादनासाठी धोरण निश्चिती करता मिळकत विभागाने दि. ९ मार्च २०१५ च्या महासभेत प्रस्ताव सादर केला होता परंतु महासभेने त्याबाबत सखोल प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, स्थायी समितीच्या सभांमध्येही भूसंपादनांचे प्रस्ताव वारंवार फेटाळले अथवा तहकूब ठेवले जात असल्याने आरक्षित जागा संपादनाबाबत अडचणी वाढत आहेत. समितीने भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्याची सूचनाही केली आहे. त्यानुसार, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी समिती गठीत केली असून त्यात शहर अभियंता, अधिक्षक अभियंता, नगररचनाचे सहाय्यक संचालक, मिळकत व्यवस्थापक आदींचा समावेश केला आहे. या समितीची बैठक शनिवारी घेण्यात आली. यावेळी सद्यस्थितीत कार्यरत असलेले प्रस्ताव, कलम १२७ नुसार प्राप्त होणारे प्रस्ताव, न्यायप्रवीष्ट बाबींमुळे आरक्षणे व्यपगत होण्याचे प्रमाण, भूसंपादनासाठी अपेक्षित खर्च, निधीची उपलब्धता, संपादनात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आवश्यक अशा आरक्षणांचे प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)