शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पोलीसपाटलांच्या नियुक्त्या सदोषच!

By admin | Updated: June 3, 2016 00:04 IST

चौकशीतील सत्य : गुणदानात हेराफेरी उघड

नाशिक : निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील, कोतवाल भरतीबाबत प्रांत अधिकाऱ्यांवर होणाऱ्या गैरप्रकाराचे आरोप सत्य असल्याचे यासंदर्भात केल्या गेलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीत आपल्याच मर्जीने बदल करून उमेदवारांच्या गुणदानात हेराफेरी केल्याचे तथ्य समोर आले आहे. या चौकशी अहवालामुळे थेट न्यायालयात धाव घेतलेल्या उमेदवारांच्या तक्रारींना पृष्टी तर मिळालीच; परंतु जिल्हाधिकारी प्रांत अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याची उत्सुकता आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनालाही त्याची दखल घ्यावी लागली आहे. निफाड व सिन्नर तालुक्यात पोलीस पाटील, कोतवाल भरतीसाठी तोंडी मुलाखती घेण्यासाठी जिल्हाधिकारी बालकृष्णन् राधाकृष्णन् यांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना समान पद्धती ठरवून दिलेली असताना निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आपल्याच मनमर्जीने मुलाखती घेतल्या. अशा मुलाखती घेताना करण्यात आलेल्या गुणदानातही मोठी तफावत संशयास्पद ठरल्याने यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मुलाखतीपूर्वीच काही उमेदवारांना ‘मध्यस्थां’करवी निरोप देऊन पैशांची मागणी करण्यात आली व त्यातूनच गुणदानात हेराफेरी झाल्याचा दावाही उमेदवारांनी केला होता. पुराव्या दाखल यासंदर्भात पैशांची मागणी व वशिलेबाजी करणारी ‘आॅडिओ क्लिप’ सोशल माध्यमावर फिरल्यामुळे तर प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र या साऱ्या प्रकाराबाबत मंगरूळे यांनी कानावर हात ठेवत, मुलाखत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी झाल्याचा छातीठोक दावा केला; परंतु उमेदवारांनी माहिती अधिकारात मागविलेली माहितीही मंगरूळे यांनी दिशाभूल करणारी दिल्याचे उघड झाले होते.