शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जप्त केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 17:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अपहार केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अपहार केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात असून, पोलिसांनीदेखील याबाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे.पंधरवड्यापूर्वी दिंडोरीतील मद्य कंपनीतून नांदेडला मालट्रकने मद्यसाठा पाठविलेला होता; मात्र मद्यसाठा नांदेडला न नेता तो मालट्रक पंचवटीतील एका महाविद्यालयाजवळ नेऊन त्यातील ३७६ बॉक्स परस्पर गायब करून लाखो रुपयांच्या मद्यसाठ्याचा अपहार मालट्रक चालक, मालक, क्लीनर व त्यांच्या अन्य सहकाºयांनी केला होता. संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अन्य सहकाºयांच्या मदतीने अपहार केल्याचे उघड झाले होते.मालट्रकमधील मद्यसाठ्याचे बॉक्स एका अन्य चारचाकीत लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने व या प्रकरणात पंचवटीतील काही संशयितांचा समावेश असल्याने अपहारातील मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. अपहार केलेला मद्यसाठा हा वाघाडी परिसरात तसेच चोरी छुप्या पद्धतीने मद्याची विक्री करणाºया अवैध व्यावसायिकांनाही दिल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले असल्याने यापूवीर्ही संशयितांनी अशाचप्रकारे मद्यसाठ्याचा अपहार केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.