शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांना मदतीसाठी गेलेल्या पोलीस वाहनाला धडक

By admin | Updated: June 23, 2017 18:52 IST

अंबडचे सहायक पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : मुबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर स्टेट बँक चौफुली येथील उड्डाणपुलावर आज पहाटेच्या सुमारास एका कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी गेलेल्या अंबडच्या पोलीस वाहनालाही ट्रकने जोरदार धडक दिली. यात सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास राणेनगर उड्डाण पुलावरुन रवींद्रकुमार पंचाळ (रा.नवा नरोडा. जिल्हा अहमदाबाद) हे त्यांची कार (क्र. ०१-आरएल-७८८१) ने जात असताना त्यांच्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने पंचाळ यांची कार पल्टी होऊन लांबपर्यंत घसरत गेली. यामुळे कारमध्ये असलेल्या पंचाळ याच्या पत्नीस हाता-पायास दुखापत झाली व कारचेही नुकसान झाले. याबाबतची माहिती अबंड पोलिसांना कळताच रात्रपाळी तील सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके व पोलीस कर्मचारी हे पोलीस वाहनात अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करण्यासाठी उड्डाणपुलावर पोेहचले. यानंतर जखमींना उपचार करण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पोलीस वाहनात बसवत होते. याच दरम्यान पाथर्डी फाट्याकडून भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र.०५ एएम-७७२७) हिचे वरील चालक रमेश गोरडे याने पाठीमागून येऊन जोरात ठोस मारल्याने सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके, पोलीस कर्मचारी दिलीप भदाने व फूलमाळी तसेच कारमधील कीर्ती कनोजिया (२६, रा.नाशिक), प्रथमेश गायधनी (२५, रा. नाशिक) व दोन्ही कर्मचारी जखमी झाले आहे. अंबड पोलिसांनी ट्रकसह चालक रमेश गोरडे यास अटक केली असून, त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.